आटपाट नगर होतं.. त्या नगरातल्या राज्याला दोन राण्या होत्या.. एक आवडती आणी एक नावडती... आवडतीचा महाल सोन्याच्या लखलखाटाने पुर्ण राज्यात ऊठुन दिसायचा... नावडतीसाठी मात्र वेशीजवळच एक जुना पुराणा दगडी चिरेबंदी वाडा.... राजा मासात कधीतर नावडतीकडे आपल्या लवाजमासमवेत भेट द्यायचा.. स्वारी आली की राणीवशात दिपावालीच असायची... पण राजासाठी सवतीमत्सरानुषंगे आलेली स्पर्धाच तेव्हढी मनोरंजनीय ... !!!
ही साठा ऊत्तराची कहाणी पाचाऊत्तरी आपण सगळ्यांनीच बर्याच वेळा ऐकली असेल.. विचार केला की ही कथा आजच्या युगात किती लागु पडु शकेल... एकदा गमतीने तीला म्हटलं होतं.. "अगं.... ऊद्या जर मी आजुन एक पाणीग्रहणं केलं..तर तुझी प्रतिक्रीया काय असेल..? हो... पण आवडती मात्र तुच राहाशील ..." .. तेव्हा त्या गमतीनेसुध्दा झालेली तीची चीडचीड मला आजुनही स्पष्टपणे आठवते आहे....
पण खरंच जर विचार केला तर ह्या सारख्या जुन्या चालीरीती एक द्रुष्ट्या या युगात नाहीत तेच किती चांगलं आहे.. येथे लोकांना एक सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात तर polygamy वगॆरे तर सोडाच. एक आवडती, एक नावडती, एक अशीच राणी ... असा काळ गेला.. माझ्या स्वत:च्याच घराण्यात माझ्या माहिती नुसार दोन अर्धांगिनीं असण्याचं ऊदाहरण माझ्या आजोबांच्या पिढीत होऊन गेलं.. त्याला सुध्दा झाले आता जवळपास सत्तर एक वर्ष.... पण खरंच म्हटलं तर जनविवंचना डावलुन मस्तानीसाठी स्वतंत्र महाल बांधणारे असे कीती बाजीराव आजच्या काळात राहीले आहेत ?
त्यामानाने आजचा पुरुष स्वत:ला जेव्हढं जास्त metro sexual portrait करता येईल तेव्हढं करतो..आजचा पुरुष बाहुबळाने लढण्यापेक्षा डोक्यानेच जास्त लढतो.. यात त्याचा काही दोष नाही .. करण जसं युग बदललंय तशी रणांगणेही बदलली आहेत.. पण हे जरी खरं असलं तरी पुरुषांना (कुठल्याही युगातले का असेनात.. ) राकट पणाच (राऊडीपणा) शोभतो.. भावनाप्रधान वगॆरे होणे पुरूषास परवडण्याजोगे नसते. स्वदेशी-स्वग्रुही असल्यास एखाद्या वेळेस मातोश्रींचा पदर मिळेलही वेळपडल्यास; पण परदेश्यात मात्रुसुखच काय बाकी काही मिळण्याची अपेक्षा नसावी. आणखी म्हणजे किती स्त्रीयांना "muma's boy" असलेले पुरुष आवडतात... ? याचं ऊत्तर negative infinity कडे झुकते.. आणी त्यात काही गैर आहे असं मलातरी वाटत नाही.. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या स्वत:च mood-swings शी cope-up करण्यात गूंतलेल्या असतात. (थोडं विषयांतरच झालं म्हणायचं..)
आता श्रुंगाराच्या अनुषंगाने या विषयाकडे बघायचं झालं तर शात्रांनुसार पुरुषास आयुषामध्ये तीन ह्रुण चुकवावयाचे असतात : देव ह्रुण - जे भगवान नारायणाचे असते आणी द्न्यानार्चन करुन चुकवले जाते. ह्रुषी ह्रुण- जे भगवान महादेवाचे असते आणी दानधर्म करुन चुकवले जाते. आणी पित्रु ह्रुण- जे भगवान ब्रह्मदेवाचे असते आणी पुत्रप्राप्तीने चुकवले जाते.
एक नारीच पुरुषाला यापॆकी तीसय्रा ह्रुणातुन मुक्त होण्यास मदत करु शकते. त्यासाठी एक "आवडती" असली म्हणजे झालं .. प्रभुरामचंद्रांनी देखील एकपत्नीश्वरता आपल्या अवतारात जपली होतीच की .. !!!
पण जर आपण स्रुष्टीच्या नियमांकडे लक्श दिलं तर प्रकर्षाने जाणुन येतं की जी असते ती नेहेमी "वरमाला"च असते.. विकल्प (choice .. or rather the ability to make a choice --- (even though choice is merely an illusion as the decisions have been already made by the divine higher authority )) हे स्रुष्टीने नारीजातीला दिलेत..
polyandry ची अशी किती ऊदाहरणे ईतिहासात सापडतात.. ? अग्नीपुत्री महातेजा पांचाली सोडली तर मला तरी आजुन कोणी आठवत नाही.. मनवतेचं सोडा निसर्गातही अशी ऊदाहरणे कमीच आहेत.....
एकंदरीतच अंत्यत: असे म्हणणे येते की
तीच्यासाठी जगावे ।
तीच्यासाठी च मरावे ॥
दुग्धशर्करेसम
समरुप व्हावे ... तीच्यामध्ये... ॥॥
Saturday, March 29, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)





4 comments:
mala ha lekh khup khup aawdla mulyala mahatva denara lekhak bhetla yacha aannd aahe
mast lihitos!
sahi blog ahe!! :)
brahmacharyanni he tisar Ruun kasa phedava....krupaya shrimantanni he sangun amachya sashank manala stirata prapt karun dyavi.....
nice one ...i appreciate your writing ...keep it up ...!!!
||Jay Shreeram||
तसा हा प्रश्न sociological आहे. जर मुला-मुलींच्या संख्येत कमी जास्ती झाले, तर अर्थातच एकपत्नीव्रत / एकपतीव्रत घेऊन राहणे किती संयुक्त आहे, याचा विचार करावा.
आपण याबाबतीत एक कायदा करून बसलो आहोत, हे विसरून चालत नाही. कदाचित त्यापाइच कितीतरी भ्रूणहत्या झाल्या असतील. कायदे हे नेहमी बदलत्या परिस्थितीनुसार जोखले पाहिजेत. सामाजिक संरचना बदलली तर त्याप्रमाणे कायदे आणि विचार बदलण्याची आपली जवाबदारी आहे.
निसर्गाच्या विरुद्ध जाण्यात काय शहाणपणा आहे?
Post a Comment